आनंद, दु:ख, राग एक ना दोन अनेक प्रकारच्या भावना....
निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या लोकांकडे व्यक्त करून झाल्या आहेत.
पण तुला सांगायचं राहूनंच गेलंय.
खास करून आनंद व्यक्त करायचाय.
तो व्यक्त न होता साठून राहिला तर त्रास होतो.
आम्हाला झालेला आनंद तुला कळायलाच हवा!
तुला तो कळत नाही तोवर तो आनंद पूर्णत्वास कसा जाईल?
तुलाही आमच्या चेहर-यावर आनंदंच बघायचा होता ना?
आहे तो… झळकतोय.
पण तुला त्यात सहभागी होता येत नाहीये याचीच हुरहुर लागली आहे.
आम्हाला झालेला आनंद तुला कळायलाच हवा! दिसायलाच हवा!
माझा विश्वास आहे कि तू अणूरेणूत भिनली आहेस.
हवा, पाणी, झाडं, वेली, फुलं, कोण्या तान्हुल्याच्या आईमध्ये,
गणपतीच्या फोटोमध्ये…. सगळ्यांमध्ये आहेस.
माझ्यामध्येसुद्धा…. ओतप्रोत भरलेली!
संस्काराच्या रूपाने, गाण्याच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने,
विठ्ठलाच्या नामामध्ये आणि कुठे कुठे…
तू आहेस, तुला सगळं दिसतंय, समजतंय….
पण तू प्रत्यक्ष समोर नाहीस ना;
आमच्या चेहर-यावरचा आनंद पाहून
तुझ्या चेहर-यावर झळकलेला आनंद आम्हाला जोवर दिसत नाही
तोवर आमचा आनंद पूर्णत्वास कसा जाईल?

No comments:
Post a Comment