अपुल्या मातॄभाषेत । आहे गोष्ट म्हणण्यात ।
ठेच लागता पुढच्याप्रत । होई मागचा शहाणा ॥
ऐसेच काहीसे झाले । अघटित काही घडले ।
शहाणपण मज आले । त्या प्रसंगावरून ॥
एकदा उपहारगॄही । वाटले असतिल सर्वही ।
परि नव्हते तेथे कोणिही । ‘ती’ एकटी बसलेली ॥
जवळ जाऊन पाहिले । पाखरूच फक्त दिसले ।
येता मी, ह्ळुच पुसले । डबडबलेले नेत्रद्वय ॥
मी केली चौकशी । का रोदन करशी?
काय दु:ख झाले तुशी । सांग मजला वेगे ॥
ऐसे मी पुसता ‘ती’ । झाली मजला अलिंगिती ।
गालावरून ओघळती । अश्रुधारा अव्याहत ॥
अखेर अश्रु आवरले । पाखरु माझे सावरले ।
अन बोलू लागले । मजला त्वेषाने ॥
लोक मैत्री करती । परि आगळेच भाव अंतरी ।
प्रेमासाठी ते करती । नाटक मैत्रीचे ॥
ऐसे ‘ती’ बोलता । मीही झालो टरकता ।
वाटले बहुदा हिला आता । कळले भाव अंतरीचे ॥
परंतु समजले नंतर । सर्व मजला साचार ।
होता हिच एक मैतर । त्याने केला पराक्रम ॥
त्याने हिला प्रेमाची । भावना बोलून दाखवली ।
आणि खोटी ठरवली । मैत्री अपुली विबुधहो ॥
ह्या सा-या प्रकारात । शहाणपण आले अंगात ।
अपुलीहि होणार हिच गत । जर आपण काही बोललो ॥
नाद मी सोडला । हिला मिळवण्याचा भला ।
मैत्रीचा नियम पाळिला । राहुन गुमान तोंडाने ।
झुरत होतो अंतरी । कुढत होतो अंतरी ।
रडत होतो अंतरी । नव्हता दुसरा उपाय ॥
३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....
15 years ago
2 comments:
pudhe lihi ki ata
bhaari lihitos!!!!
Post a Comment