दंडवत तुम्हा श्रोते । केवळ तुमच्या आशीर्वादे ।
बरवी झाली उत्साहाते । थोडी काही वाढ ॥
आजच्या या अध्यायी । मी सांगेन खास काही ।
थोडे काही ‘ती’च्याविषयी । जैसे असेल स्मरणी ॥
माझ्या गेही गणपतीला । बोलावले मी सर्वांना ।
म्हणले यावे दर्शनाला । ब्रह्मांडनायक गणेशाच्या ॥
तेव्हा ‘ती’हि आली । त्या सर्वांच्याही आधी ।
म्हणली मदतीसाठी । आले तुझ्या आईच्या ॥
घरी येणा-या मंडळींची । सरबराई करण्यासाठी ।
राबली बरोबरीनी । ‘ती’ माझ्या आईच्या ॥
खरंच श्रोते त्यादिवशी । आईसुध्दा खुष झाली ।
म्हणली हवी ऐशी । सून आपल्या घरी ॥
माझ्या लहान भावाला । आला होता ताप भला ।
ठेवले त्याला हॉस्पिटला । होता झाला नाईलाज ॥
एक दिवस संध्याकाळी । कोणी नव्हते त्याच्या जवळी ।
माझी हि कळी कोवळी । आली तेव्हा मदतीला ॥
आणखीन किस्सा एक । बसवून वर्गात माणूस ‘फेक’।
बुडविले तास अनेक । टवाळक्या करण्याकरीता ॥
मी आळशी मुळात । फिरण्याची सवय जन्मजात ।
त्यामुळे अभ्यास करण्यात । रसच नसे मजला ॥
‘ती’च मला अनेकदा । पडून माझ्या फंदा ।
मानून मला खास बंदा । माझा अभ्यास करे ‘ती’॥
गोष्ट मोठी हास्यास्पद । नाही परि संशयास्पद ।
नेहमी ‘ती’ लिहुन देत । असाईंन्मेन्ट्स मला ॥
दिवाळीत सांजेचे । आमंत्रण फराळाचे ।
दिले होते मी साचे । माझ्या सर्व गड्यांसी ॥
माझ्या सर्व गड्यांमध्ये । एकट्या ‘ती’च्यामध्ये ।
होते चातुर्य आणावयाचे । फराळ माझ्या घरी ‘ती’चा ॥
घरी जाया जेव्हा निघाले । सर्वजण अपुल्या भले ।
केवळ ‘ती’ने वाकून केले । दंडवत माता-पित्यासी ॥
असो, असे अनेक प्रसंग । घडले, असता ‘ती’ संग ।
परि एक घडला प्रसंग । सांगेन पुढे कधीतरी ॥
३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....
15 years ago